26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriप्रशासनाच्या अपयशामुळेच जिल्ह्यात जमावबंदी - अशोकराव जाधव

प्रशासनाच्या अपयशामुळेच जिल्ह्यात जमावबंदी – अशोकराव जाधव

सैरभैर झालेल्या सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली ,काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले.

प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्याचे कारण सरकार आणि प्रशासन विविध क्षेत्रात अपयशी ठरले आहेत, असे मत काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले. सैरभैर झालेल्या सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दापोलीतील चव्हाण या तरुण मुलीबाबत झालेला प्रकार, राजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, संभाजी भिडे यांची विधाने, सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेली चपराक, मणिपूरमध्ये भाजपाने केंद्र व राज्य सरकारच्यावतीने पुरस्कृत केलेल्या दंगली, जिल्ह्यातील विकासकामांबाबतच्या तक्रारी, पर्यावरण आणि आणि विस्थापितांच्या रक्षणाकरिता बारसू प्रकल्पाबाबत पर्यावरण रक्षण आणि विस्थापितांचे रक्षणविरोधात काँग्रेसची भूमिका या सर्वांना कंटाळून जनता काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आंदोलन करणार आहे.

ही माहिती घेऊन काँग्रेसला रोखण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आंदोलनासाठी येत्या चार ते पाच दिवसांत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्व काँग्रेसच्या जिल्हा, तालुका, सर्व विभाग, सेल यांची बेसिक जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १०) दुपारी १.३० वा. काँग्रेस भुवन येथे बैठक होणार आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महिला सरचिटणीस रूपाली सावंत, कॅप्टन हनिफ खलफे, जनाब कारभारी, अनिल कांबळे, तुळशीराम पवार, ॲड. अश्विनी आगाशे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती विश्वनाथ किल्लेदार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular