25.7 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriकोकण रेल्वे 'वंदे भारत'चा आरक्षण कोटा वाढवा

कोकण रेल्वे ‘वंदे भारत’चा आरक्षण कोटा वाढवा

रत्नागिरीसह खेडचा कोटा वाढवण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे; मात्र परतीच्या प्रवासात मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला रत्नागिरीला २२ तर खेडला ४ अशा केवळ २६ आसनांचा तुटपुंजा कोटा देण्यात आला आहे. हा कोटा अपुरा पडत असून, प्रवाशांना गैरसोयीला समोर जावे लागत आहे. रत्नागिरीसह खेडचा कोटा वाढवण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले. आसनक्षमता ५३० असलेल्या २२२३० क्रमांकाच्या मडगाव- सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी व खेड एसी चेअर कारमध्ये २२ जागा तर एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील ४ जागांचा अशा २६ रिमोट लोकेशन आरक्षण कोटा परिभाषित केला आहे.

उर्वरित ३७५ जागा मडगाव, थिविम आणि कणकवलीसाठी राखीव आहेत. रत्नागिरी व खेड या दोन प्रमुख स्थानकांसाठी सध्याचा कोटा अपुरा असून, २६ आसनांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर त्यापुढील त्यापुढील आरक्षण प्रतीक्षा यादीवरच जाते. २२२२९ मुंबई- सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसने सुमारे ६०-१०० प्रवासी खेड आणि रत्नागिरी येथे उतरले. तथापि, मर्यादित रत्नागिरी रिमोट बुकिंग कोट्यामुळे या स्थानकांवरून २२२३० मडगाव- सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये फक्त २०- ३० प्रवासी चढू शकतात.

याचा परिणाम सामान्यतः या स्थानकांच्या उत्पन्नासह प्रति दिवसाच्या सरासरीवर व खेडच्या उत्पन्नावर होत आहे. या पार्श्वभूमीवर २२२३० मडगाव-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमधील रिमोट लोकेशन प्रतिक्षायादीवरील आरक्षण कोटा एसी चेअर कारमध्ये किमान १०० जागांपर्यंत वाढवावा किंवा खेडमधून सुमारे ३० जागांचा अतिरिक्त रिमोट लोकेशन कोटा द्या जेणेकरून रत्नागिरी व खेडला पुरेशा जागा मिळतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular