26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriअनेक रिफायनरी समर्थक भाजपच्या वाटेवर

अनेक रिफायनरी समर्थक भाजपच्या वाटेवर

राजापूर मधील रिफायनरी प्रकल्प उभारणी समर्थनावरून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात मंथन झालीत. राजापूर  रिफायनरी प्रकल्प उभारणी ठरावाच्या वेळी विरोधी भूमिकेत असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी प्रकल्प उभारणी समर्थनाच्या बाजूने मत नोंदविल्याने त्यातील शिवसेनेच्या नगरसेविका खडपे यांच्यावर प्रकल्पला समर्थन दिल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त समोर आलेले. तालुक्यामध्ये शिवसेनेच्या एकंदर कारभाराबद्दल उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. एकासाठी एक न्याय तर दुसर्यासाठी दुसरा.

रिफायनरीसारखा प्रकल्प राजापूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह भविष्यात दर्जेदार आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा सामाजिक आणि आर्थिक विकास, रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ठरणार असल्याचे राजापूर नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी सांगितले. त्या बैठकीमध्ये निर्माण झालेल्या वादंगानंतर हे प्रकरण चांगलेच धुमसत होते.

त्यामुळे अनेक रिफायनरी प्रकल्प उभारणी समर्थकांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीमध्ये राजापूर हायस्कूलच्या सभागृहामध्ये अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळच्या कार्यक्रमात वोलताना प्रमोद जठार म्हणाले कि, ज्यांनी शिवसेनेसाठी इतकी वर्ष खस्ता खाल्या, लहानातील लहान गावाचा कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेनेची पक्ष संघटना वाढविली, त्यांना सुद्धा शिवसेनेमध्ये किंमत शून्य आहे. फक्त भावनिक राजकारण करून शिवसेना निवडणुका जिंकत आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा शिवसेनेची हळूहळू अंताकडे होणारी वाटचाल आहे. कोकणातील जनतेच्या डोळ्यावरचा पडदा आता चांगलाच दूर झाला असून, कोकणाच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांनाच जनता नाहीसे करणार आहे.

राजापूर आणि कोकणच्या हिताचा असणारा, देशाच्या विकासाला गती देणारा रिफायनरी प्रकल्प होणारच आणि तोही नाणारमध्येच, असा जाहीर दावा जठार यांनी भर सभागृहात केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular