25.3 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसंगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला 'सुरा' दाखवून खंडणी मागितली

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

१ लाख रुपयाची मागणी करून खंडणी मागण्याचा भयानक प्रकार उघड झाला आहे.

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आता सख्ख्या मुलाने आपल्या ८० वर्षाच्या वडिलांचे अपहरण करून त्यांना बांधून ठेवून त्यांच्याकडून १ लाख रुपयाची मागणी करून खंडणी मागण्याचा भयानक प्रकार उघड झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमेश्वर तालुक्यात ही थरारक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या आरोपी मुलाला चिपळूण ( पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. मुलाने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुम ारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरपऱ्या, ता. संगमेश्वर) असे संशयीत मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैशासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सुनीता मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने सोमवारी रात्री ११ वाजता घरातच हा प्रकार घडला आई आणि मुलीसमोर सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू व्हिलरवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला. पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच. सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला. त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला.

संशयीत श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास मी आता मागे हटणार नाही अशी धमकी दिली. या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी मुलाविरुद्ध तक्रार करण्याचे धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून संशयीत श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरूख पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,

RELATED ARTICLES

Most Popular