25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriचाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, ३१२ गणपती स्पेशल ट्रेन सोडणार

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, ३१२ गणपती स्पेशल ट्रेन सोडणार

गाड्या मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांतून चालवल्या जातील.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना अजून रेल्वेचे कन्फानि काट न मिळाल्याने टेन्शन आलंय. पण आता रेल्वेने त्यांच्यासाठी आनदाची बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे ‘गणपती स्पेशल ट्रेन’ चालवणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून गणपती उत्सवापूर्वी ३१२ गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याबाबत चर्चा केली आहे. यादरम्यान मध्य रेल्वेतर्फे २५७ गणपती विशेष गाड्या आणि पश्चिम रेल्वेतर्फे ५५ गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांतून चालवल्या जातील.

भाविकांना वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यावर्षी रेल्वेने ३१२ गणपती स्पेशल ट्रेन’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ मध्ये या मार्गावरुन एकूण २९४ गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा त्यापेक्षा १८ गाड्या जास्त आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. साधारणत: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची वर्दळ असते. मुंबईला इतर ज्यांशी जोडणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त आहे.

RELATED ARTICLES

Most Popular