27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunतिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

पुनर्वसानातील घरे सीडको उभारणार असून अधिकारी त्याची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीत तिवरे येथील धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तिवरेतील उर्वरीत ३३ धरणग्रस्तांना घरे बांधून दिली जाणार आहे. यातील १४ घरे तिवरे येथेच तर उर्वरीत अलोरे येथे बांधण्यात येतील. यासाठीचा निधी मंजूर झाला असून सीडको ही घरे बांधून देणार आहे. सिडकोचे अधिकारी या घरांचे सर्व्हे क्षण करण्यासाठी तिवरेत दाखल झाले आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंदवाडी उद्वस्थ झाली होती. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला होता. पाण्याच्या लोंढ्यात वाडातील बहुतांशी घरे वाहून गेली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २४ बाधीत धरणग्रस्तांना अलोरे येथे पुनर्वसन करून त्यांना घरे देण्यात आली.

१४ कुटुंबाना तिवरेत येथेच घरे हवी होती. त्यामुळे तिवरे गावातच जमिन विकत घेत तेथे पुनर्वसनातून घरे बांधली जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रूद्र चव्हाण याला घर मिळण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी उपोषण केले होते. आता रूद्र याला देखील घर दिले जाणार आहे. पुनर्वसानातील घरे सीडको उभारणार असून अधिकारी त्याची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. स्वातंत्र्यदिनापासून सुरू असलेल्या टेरव ग्रामस्थांच्या उपोषणावर पालकमंत्री म्हणाले, हा विषय माझ्यापर्यंत आला, अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समन्वयक झाला पाहीजे. आपण चौकशीचेही आश्वासन दिले. आता थर्डपार्टी कडूनही चौकशी करू. मात्र चौकशीआधीच एखाद्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा आग्रह योग्य नाही. प्रांताधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याच्या सचूना दिल्या आहेत. वेळ पडल्यास मी त्यांच्याशी बोलणार आहे.

खेड तालुक्यातील पोसरे येथील दरडग्रस्त बाधीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यासाठी त्या लोकांनी जागा निश्चीत केली पाहिजे. त्यांचा निर्णय होत नाही, तोवर पुनर्वसन होणार कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेपुर्वी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चाळके सिडकोचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मार्गताम्हाणे येथील एम आयडीसीबाबत आमदार भास्कर जाधव आग्रही असल्याबाबत विचारले असता, उद्योगमंत्री सामंत म्हणाले, त्यांनी आपल्याकडे कितीवेळा पाठपुरावा केला, हा प्रश्न आहे.

ताम्हाणेमध्ये एमआयडीसी होऊ नये, व सातबाऱ्यावरील नोंद काढावी म्हणून तेथील लोकांनीच उठाव केला आहे. तेथे उद्योजक आणि शेतकरी किती, जमिनीत कोणाची किती गुंतवणूक आहे, याची आपल्याला चांगली माहिती आहे. तालुक्यात अन्यत्र एम आयडीसी करा, पण येथे नको, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मार्गातम्हाणे मध्ये टेक्सटाईल पार्क होऊच शकत नाही. शासनाने टेक्सटाईल धोरण ठरवले. अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क होत आहे. त्यामुळे हा विषय भास्कर जाधव आणि मी बसून सोडवू असे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular