28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeRatnagiriडीझेल परतावा अजूनही प्रलंबित !

डीझेल परतावा अजूनही प्रलंबित !

मागील दोन वर्षामध्ये कोकणामध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. अनेक संकटांचा सामना कोकणवासियानी केला आहे. कोरोनाच्या संकटाने रत्नागिरीला विळखा घातला असताना, वादळ वाऱ्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. अगदी मच्छीमारी व्यवसाय सुद्धा त्यामधून सुटलेला नाही.

राज्याचे आज पासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशनामध्ये मागील तीन वर्षापासून मच्छीमारांना न मिळालेला डीझेल परतावा हा विषय रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी उठवून धरतील आणि सर्व परतावा त्वरित मिळेल अशी आशा मच्छीमार्याना लागून राहिली आहे. पावसाळी मोसमामध्ये मासेमारी जरी बंद असली तरी, कोकणातील मच्छीमार्यांचा डीझेल परताव्याचा प्रश्न अजून ऐरणीवरच आहे. पुढच्या महिन्यापासून पुन्हा मासेमारीचा व्यवसाय सुरु होईल, परंतु, नैसर्गिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांचा कोट्यवधी रुपयांचा डीझेल परतावा अजून अडकून पडला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे कोकणातील मच्छीमारांचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले. आर्थिक नुकसानी सहन करणाऱ्या मच्छीमार्यांना शासनाकडून भरीव योगदान त्वरित मिळावे यासाठी रत्नागिरीतील मच्छीमार नेते आप्पा वांदरकर यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लावून धरण्यासाठी मागणी केली आहे. प्रत्येक वेळेला शासन विविध आश्वासने देऊन, मच्छीमार्यांना अपेक्षेवर ठेऊन त्यांचा हिरमोड करतात. त्यामुळे त्यांचा हक्काचा डीझेल परतावा मिळण्यासाठी मच्छीमाराना एवढी शिकस्त करावी लागत आहे.

दरवेळी रत्नागिरीतील डीझेल परताव्याचा प्रश्न सुटला असल्याचे भासवले जाते, पण मागील तीन वर्षापासून अशीच फसवणूक मच्छीमार सहन करत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे. मच्छीमारांचा प्रलंबित डीझेल परताव्याचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडून, पुढे त्याचा सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा, असे लोकप्रतिनिधीना मागणे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular