23.2 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeKhedखेडमध्ये राज ठाकरेंचे भाषण संपले आणि महामार्गावर डंपर फोडला

खेडमध्ये राज ठाकरेंचे भाषण संपले आणि महामार्गावर डंपर फोडला

पनवेलमधील पळस्पेफाटा येथून ही पदयात्रा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लागावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरु केले आहे. रविवारी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेच्यानिमित्ताने कोलाडमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. या सभेची सांगता होते न होते तोच रविवारी सायंकाळी महामार्गावर बोरज येथे एका डंपरवर हल्लाबोल करत त्याची मोडतोड करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. या डंपरच्या काचा फोडल्या असून त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी मनसेने पदयात्रा काढली होती. पनवेलमधील पळस्पेफाटा येथून ही पदयात्रा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली. अमित यांच्या मातोश्री सौ. शर्मिला ठाकरे यादेखील पदयात्रेत सहभागी झाल्या.

रविवारी सायंकाळी पदयात्रेच्यानिमित्ताने कोलाडमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. त्यांनी त्यांच्या खास शैलीत महामार्गाच्या मुद्द्यावर सरकारवर ताशेरे ओढले. दरम्यान, कोलाडचे राज ठाकरेंचे भाषण संपते न संपते तोच शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर बोरज येथे त्याची प्रतिक्रिया उमटली. या ठिकाणी महामार्ग ठेकेदाराच्या कार्यालयाशेजारी, तसंच टोलनाक्याच्या शेजारी उभे असलेल्या डंपरवर जमावाने हल्ला चढविला. ठेकेदाराच्या डंपरच्या काचा फोडण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावर खेड आणि चिपळूणच्या दरम्यान तसेच लोटे एमआयडीसीच्या नजीक असणाऱ्या बोरज येथील टोलनाक्याचे शेजारी महामार्ग बांधकाम ठेकेदाराचे कार्यालय आहे, याच ठिकाणी ठेकेदाराचे डंपर तसेच इतर वस्तू देखील आहेत.

बोरज येथील डंपरची मोडतोड करताना जमावाने जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, आज आम्ही शांततेत आंदोलन करतो आहोत, पुढील आंदोलन शांततेत असेलच असेल असं नाही. अंत पाहू नका, असा इशारा पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या अमित ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान याप्रकरणी खेड पोलिसांनी मनसेच्या खेडमधील २ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची ‘चौकशी करण्यात आली. अखेर अटक झाली आणि जामिलावर मुक्तता देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे.

RELATED ARTICLES

Most Popular