27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriपत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया १ जुलै पासून सुरु झाले आहेत. यामध्ये दैनिक रत्नभूमी जर्नालिजम कॉलेज, रत्नागिरी येथे पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या दोन महत्वाच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत.

पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.

Journalism Diploma in Ratnagiri

पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम उत्तीर्ण झाल्यास बी.एड डिग्रीच्या प्रवेशासाठी अधिक गुणांचा भारांक मिळतो. रत्नागिरितील मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र दैनिक रत्नभूमि जर्नालिझम कॉलेज, ३/२०८, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी येथे या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु असणार आहेत.

पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम प्रवेशासाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा : ९७६३०४७७८७, ९६०४९६२३६५, ९९२१८७९६६०, ०२३५२-२२९९३९.

RELATED ARTICLES

Most Popular