29.2 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRatnagiriचिपळूण बाजारपेठ अचानक बंद ! चर्चांना उधाण

चिपळूण बाजारपेठ अचानक बंद ! चर्चांना उधाण

चिपळूण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नाही, ग्रामीण भागामधील संक्रमित रुग्णसंख्या जास्त असल्याने, जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन करत आहे. चौथ्या टप्प्यात रत्नागिरी अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी एकच  झुंबड उडाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. चिपळूण व्यापारी महासंघाने या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देऊन संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. नागरिकांची गर्दी काही प्रमाणात होती. कोरोनाच्या काळात दोन महिने दुकाने बंद ठेवण्यात आलेली, त्यांना आता चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोकणचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील काल चिपळूण पोलिस ठाण्याला भेट दिली आणि तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विविध गुन्हे उघड केल्याबद्दल चिपळूण पोलिसांचे अभिनंदन केले. पोलिस महानिरीक्षक चिपळूणला भेट देणार म्हणून चिपळूण पोलिस ठाण्याची रुपडे पालटले होते. पोलिसांच्या वतीने खास कारपेट देखील घालण्यात आले. या निमित्ताने पोलिस तपासणीदेखील होणार होती. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी पोलिसी गणवेषात उपस्थित होते. यावेळी विविध गुन्ह्यांचा कमी वेळामध्ये यशस्वीरित्या तपास केल्याबद्दल चिपळूण पोलिसांचा पोलिस महानिरीक्षक मोहिते यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

रत्नागिरी अनलॉक झाल्यापासून सुरू असलेली चिपळूण बाजारपेठ मंगळवारी अचानक बंद ठेवण्यात आल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली. नक्की कोविड प्रभावामुळे बंद पाळण्यात आला कि, पोलिस महानिरीक्षक मोहिते यांच्या दौऱ्यामुळे बंद ठेवण्यात आला, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular