22.9 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriसहा खाड्यांमध्ये बॅक वॉटर संकल्पना

सहा खाड्यांमध्ये बॅक वॉटर संकल्पना

कोकणाने पुढील पाऊल बँकवारच्या दिशेने टाकलेले पाऊल पर्यटनाच्या नकाशावर आपले नाव अधोरेखित करेल.

रत्नागिरीत रत्नसिंधू योजने मार्फत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे भाटये, जयगड, मालदोली, दाभोळ, दापोली, बाणकोट आदी ठिकाणी खाड्यांमध्ये हाऊसबोट सुरू करण्यात येणार आहे. याचा उपयोग कोकणच्या पर्यटनवाढीसाठी आणि जी वाढीमध्ये होईल, असे मत अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले. मेरीटाईम बोर्ड खाड्यातील सुरक्षिततेसंदर्भात अहवाल सादर करणार आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचा उपक्रम आहे. रत्नसिंधू योजनेतून ३ कोटी अनुदान उपलब्ध होणार आहे. यातून कोकणच्या तरुणाला रोजगार व पर्यटन विकासाला गती मिळेल. जलपर्यटनाची सुरवात होते आहे. बोट क्लबच्या माध्यमातून पैरासेलिंग, समुद्रासफारी, सर्पर बोर्ड बनामा स्पोर्टस आदी माध्यमातून कोकणातील जलपर्यटनाला गती मिळेल, असे अँड. पाटणे यांनी सांगितले.

बॅकवॉटर संकल्पनेचे ब्रँड मार्केटिंग करत केरळने जगाच्या पर्यटन नकाशावर आपले स्थान निश्चित केले आहे. केवळ अलेप्पी कोट्टायम या एवढ्या पात बॅकवॉटर व्यवसायात २३०० हाऊसबोटमार्फत किमान ५ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. या उलट भाट्ये, जयगड, सावित्री, वशिष्ठी, जैतापूर पडेल, तिलारी, देवबाग, तारकली, तेरेखोल, देवबाग, तारकली आदी नद्या खाड्यांमधील भुरळ घालणारे सौंदर्य, हिरवागार निसर्ग, रूचकर मासे दिमतोला असून देखील कोकणात बॅकवॉटर संकल्पना आपण राबवू शकलो नाही. पर्यटक नैसर्गिक सौंदर्याच्या शोधात असतो, हे आपण लक्षात घेतले नाही. तरुणांना हाऊसबोटकरिता अर्थसाहाय्य छोटया जेटी आणि प्रभावी मार्केटिंग केले तर तरयांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेत भक्कम आधार मिळेल, असा विश्वास अॅड. पाटणे यांनी व्यक्त केला.

पाणी हीच केरळची ताकद – ३८ नद्या, ५ मोठे तलाव यातील १५०० किमीच्या जलप्रवाहात केरळने आपल्या पर्यटन विकासाची बिजे शोषली. विश्वासार्ह सुरक्षितता आणि प्रभावी संपर्क व्यवस्था निर्माण केली. यातून केरळच्या जोडीपीचा १० टक्के वाटा २३.५ टक्के रोजगार ८७६४ कोटींचे परकीय चलन आणि किमान ३० हजार तरुणांना रोजगार, प्रभावी मार्केटिंगने केरळच्या बॅकवॉटरने मिळवून दिला. कोकणाने पुढील पाऊल बँकवारच्या दिशेने टाकलेले पाऊल पर्यटनाच्या नकाशावर आपले नाव अधोरेखित करेल अशी आशा आहे, असे अँड. विलास पाटणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular