25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriरत्नागिरी, सिंधुदुर्गातील १५७ घरांवर सौरछत, ४० टक्के अनुदानाचा लाभ

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील १५७ घरांवर सौरछत, ४० टक्के अनुदानाचा लाभ

भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्यादृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछतासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाची योजना सुरू आहे. महावितरणमार्फत ही योजना राबवली जात आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. घराच्या छतावर ६१४ किलोवॅट क्षमतेची सौरयंत्रणा बसवली आहे तर ९६ ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ (४०० किलोवॅट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ (२१४ किलोवॅट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ६३ (१८६ किलोवॅट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ (९९ किलोवॅट) घरगुती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॅटपर्यंत सौरछत संचास ४० टक्के तर पुढील ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान आहे. सौरछत संच अनुदानासाठी प्रति किलोवॅटप्रमाणे संचाचे मुलभूत दर निश्चित केले आहेत. १ ते ३ किलोवॅटसाठी ४१ हजार ४००, ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॅटसाठी ३९ हजार ६००, १० ते १०० किलोवॅटकरिता ३७ हजार रु.

तर १०० ते ५०० किलोवॅटकरिता ३५ हजार ८८६ असे दर आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्त्वे, एजन्सी निवडसुची, शंका- समाधान इ. माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https:// www.mahadiscom.in/ ismart/ या लिंकवर उपलब्ध आहे. १ किलोवॅट क्षमतेची सोलररूफ टॉप यंत्रणा बसवण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलररूफ टॉप यंत्रणेचे वजन जवळपास १५० किलो असते. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलररूफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीजनिर्मिती होते. सौरपॅनलची कार्यक्षमता व सौरकिरणांची उपलब्धता, भौगोलिक स्थान या घटकांचा प्रभाव एकंदरित वीजनिर्मितीवर पडतो.

RELATED ARTICLES

Most Popular