26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriनवीन पाच मतदान केंद्रे प्रस्तावित - जिल्हाधिकारी सिंह

नवीन पाच मतदान केंद्रे प्रस्तावित – जिल्हाधिकारी सिंह

आधी १ हजार ७१० मतदान केंद्रे होती. आता ती १ हजार ७१५ होणार आहेत.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पाच ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच्या १ हजार ७१० मतदान केंद्रे होती. ती आता १ हजार ७१५ होतील. मतदान केंद्राच्या स्थळात बदल झालेली २४ मतदान केंद्रे आहेत. नावात बदल झालेल्या ८१ मतदान केंद्र आणि समायोजन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. मतदान केंद्रात झालेले बदल, नवीन प्रस्तावित मतदान केंद्र, नावात बदल केलेली मतदान केंद्र, मतदारांचे समायोजन केलेली मतदान केंद्रे आदी मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत ते बोलत होते.  या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, परशुराम ढेकणे, हारिस शेकासन, राहुल पंडित, अद्वैत कुलकर्णी, परेश साळवी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, दापोली मतदारसंघात मतदान केंद्रातील मतदारांना मतदान केंद्रापासूनचे अंतर ३ किमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ५ ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. या आधी १ हजार ७१० मतदान केंद्रे होती. आता ती १ हजार ७१५ होणार आहेत.

तसेच, मतदान केंद्राच्या स्थळात बदल झालेली २४ मतदान केंद्र, नावात बदल झालेली ८१ मतदार केंद्र आणि समायोजन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या वेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी सिंह यांनी सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular