21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriबेपत्ता बालिकेचा काढला 'विराट'ने माग, वडील रागावल्याने गेली होती जंगलात

बेपत्ता बालिकेचा काढला ‘विराट’ने माग, वडील रागावल्याने गेली होती जंगलात

एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी अधूनमधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात.

मित्राच्या दुचाकीवरून शाळेत जात-येत असल्याच्या कारणावरून वडील रागावल्याने अल्पवयीन मुलीने घरच सोडले. जेव्हा बेपत्ताची तक्रार दाखल झाली, तेव्हा मुलीच्या टी शर्टाचा गंध दिल्यानंतर पोलिसांच्या विराट श्वानाने घनदाट जंगलात लपलेल्या या मुलीचा माग काढला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन समुपदेशन करून नातेवाइकांच्या स्वाधीन केले. एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी अधूनमधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात होती. म्हणून मुलीचे वडील तिला रागावले. या कारणावरून घाबरून जाऊन ही अल्पवयीन मुलगी गुरुवारी (ता. २८) सात वाजता घरातून निघून पेढांबे जंगलात निघून गेली.

२९ सप्टेंबरला सायंकाळी श्वान विराटला त्याच्या हँडलरद्वारे या मुलीच्या घरातील तिचा टी शर्टाचा गंध देण्यात आला. श्वान विराटला गंध मिळताच क्षणातच त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलाच्या दिशेने माघ काढला. या मुलीला श्वान विराटच्या मदतीने पोलिसांना पेढांबे येथील घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. काही वेळातच पोलिसांना व तिच्या नातेवाइकांना त्या मुलीजवळ नेऊन उभे केले.

मुलगी उशिरापर्यंत घरी न परतल्याने आणि तिचा शोध घेऊनही कुठेही मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी अलोरे- शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. मुलीच्या नातेवाईकांनी तसेच पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवली; परंतु ती रात्री मिळून आली नाही. म्हणून पुन्हा काल सकाळपासूनच शोधमोहीम राबवली तरी ती मिळून आली नव्हती. अखेर अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी रत्नागिरीतील श्वानपथकाची मदत घेतली. त्यात यश आले. मुलीचे योग्य समुपदेशन करून तिची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली आहे. तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular