24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातील दुपारचा प्रकार

कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातील दुपारचा प्रकार

पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. ३ मध्ये लांजा कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चौकीदाराने कार्यालयाच्या आवारातच फिनेल पिऊन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी (ता. १) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अत्यवस्थ कर्मचाऱ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले, की सतीश सदाशिव कासारे (३१, रा. मंडणगड, सध्या लांजा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. कासारे चौकीदार म्हणून अनुकंपा तत्त्वावर २०२१ मध्ये नोकरीला लागले; मात्र मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन महिने पगार नव्हता. आजारपणाचा झालेला खर्च, कुटुंबाची होणारी उपासमार त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करूनही वरिष्ठ अधिकारी त्यांना कामावर हजर करून घेतले नव्हते. या त्रासाला कंटाळून कार्यालयाशेजारी असलेल्या मोटीरीत बसून फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES

Most Popular