26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeRatnagiriपरिवहन विभागातील ऑनलाईन बदल्या रखडल्या

परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्या रखडल्या

परिवहन आयुक्त कार्यालयाने दखलच न घेतल्याने अखेर अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे.

राज्य परिवहन विभागात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या १६६ मोटारवाहन निरीक्षक, तर ३२५ सहायकांच्या बदलीपात्र यादीचा घोळ कायम आहे. यामध्ये कोकणातीही आरटीओ कार्यालयातील ४ निरीक्षकांचा समावेश आहे. राज्यभरातील अधिकाऱ्यांनी यावर आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. त्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाने दखलच न घेतल्याने अखेर अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांकडेच असलेल्या या परिवहन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ३ वर्षे बदल्या रखडल्या आहेत. बदलीपात्र असलेल्या मोटारवाहन निरीक्षकांनी एकमेकांच्या बदली पात्र क्रमांकावर आक्षेप नोंदवले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उत्तीर्ण उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर रूजू प्रत्यक्षात विभागात होण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा कालावधी लागला आहे. त्यामुळे विभागीय नियुक्तीच्या घेण्यात आलेल्या नोंदी चुकीच्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत ज्येष्ठता यादीत मानीव रूजू दिनांक एकाच परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वात आधी रूजू झालेल्या उमेदवारांचा रूजू दिनांक ग्राह्य धरण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

शिवाय मॅटने बदली पात्र यादीमधील आदिवासी भागांत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाराच्या नावांपुढे तशा प्रकारची नोंद घेऊन यादी नव्याने प्रसारित करण्याचे आदेश केले आहेत. त्यानंतरच बदली आदेश काढण्याचे मॅटने आदेश परिवहन विभागाला दिले आहेत. कोकणातीत चार निरीक्षकांचा या यादीत समावेश असल्याचे समजते. लवकरात लवकर बदली प्रकिया करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular