मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. हे महामार्ग पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने ग्रीनफिल्ड द्रुतगती प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई सिंधुदुर्ग नव्या सहा पदरी महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. दोन महामार्गांचे काम अर्धवट स्थितीत असतानाच तिसऱ्या महामार्गाचे गाजर कोकणवासीयांना दाखविण्यात आल्याची टीका होत आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग या सहा पदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेसवेच्या काम साठी शंभर मीटर रुंद भूसंपादनाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ३८८.४५ किलोमीटर महामार्ग उभारण्यात येणार आहे. हे काम चार टप्प्यात केले जाणार आहे.
हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रास्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या मार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार महाम र्गासाठी विविध पर्यायी आखणीचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम आखणी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ग्रीनफिल्ड द्रुतगतीवरून ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास केला जाणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गङ्गमुंबई ते सिंधुदुर्ग असा सहा पदरी रस्ता तयार होणार आहे. सिंधुदुर्ग असा महामार्ग असणार आहे. महाविकास आघाडी शासनाच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकासमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२० या संदर्भात विधिमंडळात घोषणा केली होती.
त्याला राज्यसरकारने मंजुरी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, प्रतितास शंभर किमी वेगसाठी संकल्पित करणे, त्यानुसार शंभर मीटर रुंद भूसंपादनासाठी शासनाने मान्यता’ दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १९२ वर्ष सुरू आहे. रेवस-रेड्डी महामार्गाचे कामही अर्धवट स्थितीत आहे. ही कामे प्रलंबित असतानाच ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात येत आहे.