26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeSindhudurg'रत्नागिरी-सिंधुदुर्ग' भाजपच लढविणार - नारायण राणे

‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ भाजपच लढविणार – नारायण राणे

शिंदे गट आणि भाजप यांची लोकसभेसाठी युती असणार हे उघड आहे.

लोकसभेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपचाच आहे. तो भाजपच लढविणार पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी आज येथे दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपला यावरून सध्या राजकीय चढाओढ आहे. सुरू त्या पार्श्वभूमीवर श्री. राणे यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण जात आहे.

शिंदे गट आणि भाजप यांची लोकसभेसाठी युती असणार हे उघड आहे. पूर्वीच्या युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. सध्या येथील खासदार विनायक राऊत शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत. नव्याने झालेल्या भाजप-शिंदे गट युतीत दोघांनीही या जागेवर दावा केला आहे. शिंदे गटाकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची नावे चर्चेत आहेत. केसरकर यांनी अप्रत्यक्षरित्या इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular