28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeRatnagiriकुवारबावमध्ये चौपदरीकरणाला वेग - मिर्‍या-नागपूर महामार्ग

कुवारबावमध्ये चौपदरीकरणाला वेग – मिर्‍या-नागपूर महामार्ग

कुवारबाव बाजारपेठेतील दुकाने पाडून रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.

मिर्‍या – नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये असलेल्या कुवारबाव बाजारपेठेतील काम अखेर सुरू झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मोटर जागा संपादित करण्यात आली. यामध्ये आलेली बाजारपेठेतील दुकाने, गाळे आदी हटविण्यास सुरुवात झाली आहे. येथे उड्डाणपूल होणार असल्याचे समजते. बाजारपेठ वाचणार असल्याने या कामाला बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काम अधिक वेगाने सुरू आहे. मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणात कुवारबाव बाजारपेठेतील दुकाने पाडून रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.

मिर्‍या नागरपूर रस्त्यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख तालुक्यातील जागा संपादित करण्यात आली आहे. आंबा घाटापर्यंतच्या संपादनाची जबाबदारी येथील प्रांत कार्यालयाकडे होती. यामध्ये २१ गावांचा समावेश आहे. भूसंपादन होऊन त्यांना शासनाकडून मोबदला वाटप करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, कुवारबाब बाजारपेठ या रस्त्यामध्ये उद्ध्वस्त होत असल्याने या रस्त्याला तेथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. अनेक वेळा भूसंपादनाचे काम थांबविले होते. पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्यात आले होते.

मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने देखील केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती; परंतु या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रकल्प असल्याने यामध्ये कोणताही बदल झाला नाही. अखेर उड्डाणपुलाचा निर्णय झाला आहे. दोन्ही बाजूंनी समान जागा जावी, यासाठी हा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार ही पंधरा मीटरची जागा संपादित करण्यात आली असून आता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनीही या कामाला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारल्याने या भागातून वेगाने काम सुरू झाले आहे.

सर्व्हिस रोडबाबत संभ्रम – कुवारबाव येथे बाजारपेठ वाचविण्यासाठी उड्डाण पुलाचा प्रस्ताव असल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून निश्चित झालेले नाहीत. उड्डान पूल असेल तर त्याला सर्व्हिस रोड कसा असेल, किती उंचीचा असेल, याबाबत व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular