27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriलांज्यात दुकान फोडले, बॅटऱ्या, रोकडसह २५ हजारांचा डल्ला!

लांज्यात दुकान फोडले, बॅटऱ्या, रोकडसह २५ हजारांचा डल्ला!

दुकानात चोरी झाल्याची बाब लक्षात येताच उमेश पेटकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली.

लांजा तालुक्यात दुकानाच्या शटरची कुलपे तोडून आतील बॅटऱ्या आणि रोख रक्कम असा एकूण २४ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ या कालावधीत लांजा कोर्ले फाट्यानजीकच्या उपशेट्येवाडी येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोर्लेफाटा उपशेट्येवाडी येथे उमेश श्रीरंग पेटकर (रा. लांजा खावडकरवाडी) यांचे अभिषेक बॅटरी या नावाचे दुकान आहे. उमेश पेटकर हे शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. शनिवारी ७ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या दोन्ही शटरची कुलपे अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दुकानात चोरी झाल्याची बाब लक्षात येताच उमेश पेटकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. या घटनेत दुकानातील ३ हजार ७३६ रूपये किंमतीची एक मरॉन बी एल आरएमएफ कंपनीची बॅटरी, ३ हजार ४८९ रुपये किंमतीची मरॉन  हिरव्या रंगाची बॅटरी, ७ हजार ३३० रुपये किंमतीच्या दोन मरॉन फ्लो कंपनीच्या हिरव्या रंगाच्या बॅटऱ्या तसेच चारशे रुपये काऊंटर टेबलच्या ड्रायव्हरमध्ये असलेली चिल्लर, १० हजार रुपये किंमतीचा एक एचडीएम आय कंपनीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण २४ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत. गेल्या महिन्याभरात लांजा शहरात वाहनांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले असून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या वाहनांच्या बॅटऱ्या तसेच कोर्ले फाटा येथून डंपर आणि इतर वाहनांच्या A बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून लांजा शहरात बॅटरी चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याचे स्पष्ट होत. मात्र या चोरीच्या घटनांमुळे वाहन चालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular