28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeRatnagiriआंबा, काजू विम्यासाठी ३० नोव्हेंबर मुदत - कृषी विभाग

आंबा, काजू विम्यासाठी ३० नोव्हेंबर मुदत – कृषी विभाग

खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे.

फळपिकांकरिता पीकविमा योजना पुढील आर्थिक वर्षासाठी जाहीर झाली असून, त्यामध्ये आंबा, काजूचा समावेश आहे. याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. मागील वर्षाचा विमा परतावा जिल्ह्यातील २४ हजार बागायतदारांना मिळालेला नाही; मात्र नवीन विम्यासाठी हप्ता भरावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित कालावधीत फळबागांना विमा सरंक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे.

खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये व विमा हप्ता १३ हजार ३०० रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये व विमा हप्ता ५ हजार रुपये आहे. हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग आर्द्रता आदी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular