27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiri११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र

११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र

महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील युवकांसाठी ११ ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आह. याचे उद्घाटन १९ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणांनी सज्ज होऊन काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या. आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शिरगाव, नाचणे (ता. रत्नागिरी), खेर्डी, सावर्डे (ता. चिपळूण), पालशेत (ता. गुहागर), उमरोली (मंडणगड), जालगाव (दापोली), भरणे (खेड), सागवे (राजापूर), भांबेड (लांजा), कडवई (संगमेश्वर ) या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  ज्या गावात हे केंद्र सुरू होणार आहे त्याच्या आजुबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांना यामध्ये सहभागी करून घ्यावे.

या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सेंटरसाठी अनुभवी कार्यक्रम प्रमुख नियुक्त करावा. कार्यक्रमासाठी मंडप किंवा सभागृह व्यवस्था, बैठक व्यवस्था, दृकश्राव्य व्यवस्था, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी व्यवस्था कराव्यात तसेच वीजपुरवठा सुरळीत राहावी यासाठीची व्यवस्था करावी, असे त्यांनी सूचित केले. ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित करणे, प्रशिक्षण केंद्र असलेल्या स्थळावर प्रक्षेपणासाठी ऑडिओ व्हिज्युअल साधनांची उपलब्धता करणे, मुलभूत सोयीसुविधांची व्यवस्था करणे आदींबाबतही त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular