26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedधनगर समाजाचा ७० वर्षांचा कोकण परिसरात संघर्ष

धनगर समाजाचा ७० वर्षांचा कोकण परिसरात संघर्ष

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकणातील धनगर समाज गेले सत्तर वर्ष संघर्ष करत असून, पावसामुळे जरी आमचे हेलिकॉप्टर उतरण्यास विलंब झाला असला तरी आमच्या पाठीमागे लोकांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आमचे हेलिकॉप्टर सुरक्षित उतरले. धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजता खेडमध्ये हेलिकॉप्टरने एंट्री घेतली. यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर नियोजित वेळेत न उतरता तब्बल अर्धा तास उशिराने उतरले. त्यानंतर ते बोलत होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची खेडमधील भरणे येथे मंगळवारी धनगर जागृती सभा होती.

त्यासाठी पडळकर हेलिकॉप्टरने खेडमध्ये येणार होते. मात्र नेमके हेलिकॉप्टर उतरण्याचे वेळेत सोसाट्याच्या वारा व मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी भरणे येथील हेलिपॅडवर पडळकर यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास तब्बल अर्धातास विलंब झाला. त्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण झाले होते. सायंकाळी ४.१४ वाजता पडळकर यांच्यासह स्वीय सचिव, अंगरक्षक यांना घेऊन धनगर समाजाच्या कार्यकत्यांना घेऊन उतरले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पडळकर म्हणाले, कोकणातील धनगर समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित, वंचित आहे. त्यामुळे कोकणातील बांधवांना भेटून त्यांना देखील राज्यातील समस्त धनगर समाजासोबत पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular