26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी पदी डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी पदी डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती

रत्नागिरीचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे येथे बदली झाल्यावर, नवीन कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागून होते. अखेर ती प्रतीक्षा संपली असून, रत्नागिरी जिल्हाधिकारी पदी डॉ. बी.एन.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पाटील यांनी काम पाहिले आहे. त्या काळात केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील केलेल्या विकास कामांमुळे स्वच्छता अभियानाअंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत कागदी घोडे न नाचवता पेपरलेस कामाला पुढाकार दिल्यामुळे कोच पुरस्कार, अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कामासाठी मिळाला आहे.

त्याचप्रमाणे, डॉ.पाटील यांनी आपल्या मागील अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पेपरलेस बनवून ऑनलाइन संगणकीकरण करण्याचे धोरण स्वीकारले. तसेच दररोजची जि. प. कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक आँनलाईन प्रणालीद्वारे लागू केली, त्यामुळे अनेक टंगळमंगळ करणाऱ्याना, उशिरा कार्यालयात येणार्यांना चाप बसला, ज्या गावामध्ये पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध नव्हती, अशा गावांच्या पाणीपुरवठ्याचे काम सुरळीतपणे सुरू करून त्यांनी दिले. अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.

माजी जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण आटोक्यात आणण्यास असमर्थ ठरल्याने जनता नाराजच होती, त्यामुळे आत्ता सर्व रत्नागिरीकरांचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या कार्यपद्धती आणि रत्नागिरीच्या विकासासाठी काय पाउल उचलतात याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular