25.3 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriरत्नागिरीत क्रीडांगणात भ्रष्टाचाराचा खेळ, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा आरोप

रत्नागिरीत क्रीडांगणात भ्रष्टाचाराचा खेळ, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा आरोप

क्रीडांगणाच्या कामतील गैरव्यवहाराबाबत दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद दिला गेला नाही.

रत्नागिरी पालिका हे भ्रष्टाचाराचे कुरणच आहे. शहरातील शिवाजी क्रीडांगणाच्या देखभालीच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. तरी क्रीडांगणामध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. मग कशाची देखभाल होते? हा निव्वळ भ्रष्टाचार आहे, असा आरोप करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ पालिकेवर धडकले. त्यांनी सहायक मुख्याधिकारी माने यांना जाब विचारला. दोन दिवसांत आम्ही तुम्हाला लेखी देऊ, असे उत्तर त्यांनी शिष्टमंडळाला दिले. रत्नागिरी पालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे मुख्य केंद्र, असा आरोप काही दिवसांपूर्वी काँग्रेसने केला होता. त्यानंतर दिलेल्या निवेदनाचा पाठ पुरावा करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि सामान्य जनता एकत्र जमून आज पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

काँग्रेसच्या शिष्टमंडळातील कपिल नागवेकर, दीपक राऊत आदींनी पालिकेच्या शिवाजी क्रीडांगणाच्या देखभालीचा मुद्दा उचलून धरला. क्रीडांगणाच्या कामतील गैरव्यवहाराबाबत दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे. कंत्राटदार आपल्याच पद्धतीने कामे काढत आहेत. त्यांना विचारणा केली असता पालिका अधिकारी व आम्ही ठरवून कामे काढतो, अशी उत्तरे देत आहे. तसेच तीन महिन्यांपूर्वी किल्ला विभागामध्ये साळवी यांच्या घरामागचे लाखो रुपये खर्च करून गटाराचे काम केले गेले होते; परंतु ते कोसळले. असे काम करूनही त्या कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात आले, असा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला.

याबाबत सहायक मुख्यधिकारी माने यांना विचारणा करण्यात आली तसेच मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित नसल्याने त्यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. त्या वेळेस दीपक राऊत यांनी शिवाजी स्टेडियम येथे देखभालीच्या नावावर सामान्य जनतेचे हजारो रुपये खर्च होत आहेत. मग देखभाल काय होते? हा निव्वळ भ्रष्टाचार आहे, असा आरोप केला. ‘आम्ही तुम्हाला दोन दिवसात लेखी उत्तर देऊ,’ असे आश्वासन माने यांनी दिले. या वेळी महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे, प्रदेश सचिव सुश्मिता सुर्वे, विधानसभ क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, तालुका सरचिटणीस काका तोडणकर, प्रमोद सक्रे, सुबोध कुंटे, कैलास कुबल, दर्शन- सक्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular