31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

लांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

जीवनसाथी अॅपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने...

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...
HomeRatnagiriमनोरुग्णालयात सात अधिकाऱ्यांची पदे रिक्त पालकमंत्र्यांना साकडे

मनोरुग्णालयात सात अधिकाऱ्यांची पदे रिक्त पालकमंत्र्यांना साकडे

या रुग्णालयात दररोज सरासरी १२५ ते १५० बाह्यरुग्ण उपचारांकरिता येत असतात.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कार्यकक्षेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली हे चार जिल्हे आहेत. या मनोरुग्णांलयाकरिता एकूण खाटांची संख्या ३६५ असून, सरासरी आंतररुग्णांची संख्या ही २२५ ते २५० इतकी आहे. या रुग्णालयात दररोज सरासरी १२५ ते १५० बाह्यरुग्ण उपचारांकरिता येत असतात. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ पदे रिक्त असून, ती भरावीत, असा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या रुग्णालयाकडील रुग्ण तपासणी व उपचार करण्याकरिता जिल्हा रुग्णालयाकडील एका मनोविकारतज्ज्ञांची आडवड्यातून एक दिवस सेवा वर्ग करण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत ११ महिन्यांसाठी मानधन पद्धतीने या तज्ज्ञाची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. दाखल असलेल्या मनोरुग्णांची वैद्यकीय तपासणी व उपचार तसेच दाखल करण्यापूर्वी या रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणे क्रमप्राप्त असल्याने वैद्यकीय अधिकारी हे पद गरजेचे आहे. वैद्यकीय अधीक्षक १, उपअधीक्षक १, मनोविकृती तज्ज्ञ १, बधिरीकरण १, वैद्यकीय अधिकारी ३ सर्व गट अ ची एकूण ७ पदे मंजूर असून, त्यापैकी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत तसेच वैद्यकीय अधिकारी गट-ब चे १ पद मंजूर असून, संबंधित पद हे बदलीने रिक्त आहे.

मनोविकृतीतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण ७ पदे रिक्त असल्याने मनोरुग्णांना सेवा देताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात मनोरुग्णालय प्रशासनाने केले आहे. नमंद शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यकतेनुसार, पुरेसे मुनष्यबळ पुरवून रुग्णसेवा देणे अपेक्षित असताना मंजूर पदांच्या क्षमतेने ५१ टक्केच मनुष्यबळावर कसरत सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular