26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriनाचणे जलशुद्धीकरण केंद्र होणार सुरू

नाचणे जलशुद्धीकरण केंद्र होणार सुरू

शीळ धरणातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे.

गेल्या सहा वर्षापासून बंद असलेले पालिकेचे नाचणे येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्र आठ-दहा दिवसात सुरू होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर पानवल धरणातून येणाऱ्या पाण्याचे येथे शुद्धीकरण होऊन ते पाणी शहराला दिले जाईल. त्यामुळे शीळ धरणावर असलेल्या शहराचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. शहराच्या नवीन नळपाणी योजनेचे काम २०१७ पासून सुरू झाले. या योजनेमध्ये नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचेही काम असल्याने जुने जलशुद्धीकरण केंद्र बंद झाले त्याचबरोबर पानवल धरणातून मिळणाऱ्या पाण्याचाही पुरवठा थांबला. या धरणाची साठवण क्षमता ५११ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्यामुळे आता हे पाणी शहराला मिळू शकणार असल्याने शीळ धरणातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे.

शीळ धरणावरील जॅकवेल गेल्या महिन्यात कोसळल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा १२ दिवस विस्कळीत झाला होता. अनेक ठिकाणी पाणीही मिळत नव्हते. नाचणे जलशुद्धीकरण केंद्र आणि हेच पानवल धरण कार्यान्वित असते तर जॅकवेल दुर्घटनेनंतर रत्नागिरीकरांना पाणी… पाणी करावी लागले नसते. जॅकवेल कोसळल्यानंतर पाण्याची. टंचाई निर्माण झाली. भविष्यात अशा पद्धतीने पाणीटंचाई जाणवू नये यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर, पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी नवीन नळपाणी योजनेतील नवीन नाच जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा केला. या केंद्रासाठी आवश्यक असलेली जलवाहिनीसुद्धा टाकून झाली आहे. आता नाचणे जलशुद्धीकरण केंद्रातील काम अंतिम टप्प्यात असून, येत्या आठ ते दहा दिवसात हे केंद्र कार्यान्वित होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular