27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriवीज प्रकल्पातील कामगार पुन्हा कामावर - उद्योगमंत्री सामंत

वीज प्रकल्पातील कामगार पुन्हा कामावर – उद्योगमंत्री सामंत

या कामगारांनी किरण सामंत व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

रत्नागिरी वीज प्रकल्पातील पॉवरब्लॉकमध्ये ठेकेदारी पद्धतीत सुमारे १६ वर्ष काम करणाऱ्या १५ स्थानिक कामगारांना उत्पादन कमी झाल्याचे कारण देत कामावरून कमी केले. हे कामगार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला सांगून त्यांना पूर्ववत कामावर ठेवण्याची तंबी दिली व कंपनीने ते मान्य करत या कामगारांना कामावर परत घेतले. गेले वर्षभर रत्नागिरी वीज प्रकल्प कंपनीत पूर्णपणे वीज क्षमता उत्पादन करण्याची कार्यक्षमता असूनही वीज उत्पादनासाठी लागणारा गॅस अत्यंत महाग झाल्याने विजेचा दर परवडत नाही. परिणामी, या कंपनीकडून वीज घेण्यास कोणी तयार होत नाही.

यामुळे वीज उत्पादन कमी असे कारण सांगून स्थानिक कामगार कमी करण्याचे सत्र चालू आहे. आतापर्यंत अनेक कामगारांना यामुळे कंपनीने कमी केले आहे. कंपनीतील पॉवरब्लॉकमध्ये काम करणाऱ्या १६ स्थानिक कामगारांना सप्टेंबरपासून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याबाबत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला; परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. या कामगारांनी किरण सामंत व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामंत यांनी रत्नागिरी विद्युत प्रकल्प कंपनीचे एचआर मॅनेजर जॉर्ज फिलिप्स व कंपनीतून काढलेल्या १६ कामगारांची एकत्र बैठक घेतली.

या बैठकीत स्थानिकांनाच रोजगार मिळणार नसेल तर अशा कंपन्यांचा काय उपयोग आहे, असे कंपनीला आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मच सुनावले. या वेळी कंपनी प्रशासनाने नोव्हेंबर २०२३ पर्यंत दिलेल्या रोस्टरप्रमाणे कामावर सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले तसेच डिसेंबरपासून पूर्ववत नियमित सर्व कामगारांना रोजगार मिळेल, अशी हमी दिली.

उरण येथील गॅस मिळावा – या वेळी रत्नागिरी वीज प्रकल्पाचे एच. आर. मॅनेजर फिलिप्स यांनी उरण येथील पुरवठा होणारा गॅस आरजीपीपीएलला मिळाला तर वीजदर आम्हाला नियंत्रित ठेवता येतील व हा प्रकल्प सुरू होण्याकरिता चालना मिळेल, अशी विनंती केली. त्यावर सामंतांनी कंपनीसंदर्भातील सर्व टेक्निकल माहिती मुख्यमंत्र्यांसमोर आपण ठेवू तसेच हा प्रकल्प राज्याच्यादृष्टीने किती महत्त्वाचा आहे, हेदेखील त्यांना सांगू, भविष्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular