23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeChiplunचिपळुणात महामार्गाच्या सर्व्हिस रोडने वाहने सुसाट, अपघात होण्याची भिती

चिपळुणात महामार्गाच्या सर्व्हिस रोडने वाहने सुसाट, अपघात होण्याची भिती

स्थानिक प्रशासन काम प्रांत ऑफिस, नगरपरिषद आणि पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चिपळूण शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या सर्व्हिस रोडचा वापर हायवे प्रमाणे होत आहे. महामार्गाला लगत माकंडीतील दोन ठिकाणी बाहेर येताना अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नेमके कोण मार्गदर्शन करणार किंवा कोण गतिरोधक बसवणार हा प्रश्न आहे. उड्डाण पूल होईपर्यंत सर्व्हिस रोडची लांबी व रुंदी वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. चिपळूण शहरातून बहादुरशेख नाका ते प्रांत ऑफिसपर्यंत उड्डाणपूल असून त्या पुलाखालून शहरवासीयांना सर्व्हिस रोड दिला आहे. पण पुलाच्या निकृष्ट कामामुळे काम सुरू असतानाच पुल कोसळला. म्हणून सर्व्हिस रोडची डागडूजी केली. पण सर्व्हिस रोड वरून सध्या चार चाकी, ट्रक, बस, कंटेनर या गांड्या जोरात धावत आहेत.

यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रभात रोड, मार्कंडी प्रथमेश बिल्डिंग, प्रतीक आवास गल्ली, परशुराम नगर कडे जाणारी गल्ली, शालोम गल्ली, जाणारी गल्ली, शिवाय राधाकृष्ण नगर फाटा, मतेवाडी फाटा, ओझर वाडीफाटा, शिवाजीनगर या ठिकाणी अपघात आणि शक्यता आहे. तरी या सर्व्हिस रोडला गतीरोधक बसवावेत, अन्यथा कोणाचा बळी गेल्यानंतर बसवणार का? याकडे स्थानिक प्रशासन काम प्रांत ऑफिस, नगरपरिषद आणि पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular