30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriमांडवी जेटीवरील विद्युतखांबांची तोडफोड

मांडवी जेटीवरील विद्युतखांबांची तोडफोड

भविष्यात असे कृत्य कोणी करता कामा नये, यासाठी योग्य ती सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पर्यटकांचे आणि शहरवासीयांचे विरंगुळ्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मांडवी जेटीवरील विद्युतखांबांची काही माथेफिरूंनी तोडफोड केली. सुशोभित मांडवी जेटीचे नुकसान करून विद्रुप करण्याचे काम काही विघ्नसंतोषींनी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. माथेफिरूंच्या या कृत्याचा मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांनी आणि पर्यटकांनी तीव्र शब्दात निषेध केला. भविष्यात असे कृत्य कोणी करता कामा नये, यासाठी योग्य ती सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. रत्नागिरी शहराची शान आणि प्रवेशद्वार असलेल्या मांडवी जेटीला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. दरदिवशी या जेटीवर शेकडो पर्यटक किंवा रत्नागिरीकर आपला वेळ घालवतात.

सकाळी मॉर्निंग वॉक किंवा फिरण्यासाठी आणि संध्याकाळीही पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने जेटीवर असतात. २०१७ पूर्वी जेटी पूर्ण जीर्ण झाली होती. आमदार उदय सामंत यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन कोट्यवधीचा निधी मंजूर करून दिला. २०१७-१८ मध्ये जेटीच्या सुशोभीकरणाचे निर्माण ग्रुपकडून सुशोभीकरण केले. जेटीवर रेलिंग केले असून बाकडीही आहेत. रात्री रोषणाईमुळे मांडवी जेटी अधिक खुलून दिसते; परंतु आज सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या मंडळींनी एक धक्कादायक प्रकार पाहिला.

जेटीच्या टोकावरील अनेक दिव्यांची माथेफिरूंनी तोडफोड केली होती. बल्ब काढून टाकले होते. वायरी तोडल्या होत्या. त्यामुळे या जेटीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, गेट बसवण्याची मागणी होत आहे. या माथेफिरूंवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ही जेटी मेरीटाईम बोर्डाकडे आहे. कामदेखील मेरीटाईम बोर्डामार्फतच झाले; परंतु विद्युतीकरण देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे वर्ग केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular