23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRajapurराजापुरात रब्बी हंगामाची लगबग

राजापुरात रब्बी हंगामाची लगबग

भुईमुगासारख्या काही रब्बीतील पिकांना ओलाव्याची जमिन पेरणीला पोषक ठरत नाही.

खरिपाचा हंगामातील भातशेती अंतिम टप्प्यात असताना तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीची लगबग वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात विविध फळभाज्यांसह कुळीथ आदीसाठी जमिनीची नांगरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतांमध्ये रोपांची रूजवात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतकरी कुळीथ, संकरित मका, कडधान्य, पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात.

सध्या नांगरणीची कामे वेगाने सुरू आहेत. भुईमुगासारख्या काही रब्बीतील पिकांना ओलाव्याची जमिन पेरणीला पोषक ठरत नाही. त्यामुळे दिवसागणिक वाढत जाणाऱ्या वातावरणातील उष्म्याच्या प्रमाणामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन जमीन तापू लागल्याने रब्बीतील अशा पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा फायदा घेत नांगरणी आणि अन्य मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular