23 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळूण रेल्वेस्थानकातील रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी २ कोटींचा निधी

चिपळूण रेल्वेस्थानकातील रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी २ कोटींचा निधी

रेल्वेस्थानक ते महामार्गापर्यंतच्या ४७० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे.

कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला रेल्वे स्थानकाशी जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सध्या जोरात सुरू आहे. रस्त्याच्या एकेरी बाजूने काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख स्थानकांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ६५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कामाचे भूमिपूजन झाले.

आता प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. चिपळूण रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी २ कोटी ४३ लाखांचा निधी मंजूर आहे. रेल्वेस्थानक ते महामार्गापर्यंतच्या ४७० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. हा रस्ता ७ मीटर लांबीचा असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दीड मीटर रूंदीचा फूटपाथ तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यावर निवाराशेड उभी केली जाणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात येणार आहेत. पुढील दहा वर्षे या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे पडू नयेत याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. रस्त्याच्या परिसरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी मोऱ्या टाकण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular