29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeRatnagiriराज्याच्या धोरण समितीमध्ये मत्स्य महाविद्यालयाला स्थान

राज्याच्या धोरण समितीमध्ये मत्स्य महाविद्यालयाला स्थान

अखेर मंगळवारी राज्य शासनाच्या मत्स्य विभागाकडून जिल्हा समिती जाहीर झाली.

राज्याने घोषित केलेला राज्यमास्याचे जतन तथा लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालून शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी एक तांत्रिक समिती गठित करण्याचे मत्स्य खात्याकडून जाहीर केले; मात्र एकमेव असलेल्या रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाला या समितीमध्ये स्थान दिले नव्हते. मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे यांनी याबाबत मागणी केली होती. त्याला यश आले असून, मत्स्य घोरण ठरवणाऱ्या तांत्रिक समितीत मत्स्य महाविद्यालयाला स्थान दिले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय बाबत विविध धोरण ठरवणाऱ्या तांत्रिक समितीमध्ये संपूर्ण कोकणातील एकमेव येथील मत्स्य महाविद्यालयाला स्थान देण्यात आले नव्हते.

ही बाब रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते अविनाश जाधव व अभिजित पानसे यांच्या मत्स्य विद्यापिठाने मागणी लावून धरली. माजी शहर अध्यक्ष अरविंद मालाडकर, शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, नाविकसेना राज्य सल्लागार प्रवीण गोळवणकर, जिल्हाचिटणीस बिपिन शिंदे व जिल्हा संघटक जयंत कोठारकर यांनी लक्षात आणून दिली. स्वतंत्र मत्स्यविद्यापिठाची स्थापना तातडीने व्हावी व या संबंधीचा भालचंद्र मुणगेकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी रत्नागिरीमध्ये मनसे नेते अभिजित पानसे यांची पत्रकार परिषद झाली होती.

आणखी एक विषयाला हात घालत अभिजित पानसे यांनी महत्वाची मागणी केली होती की, समितीमध्ये रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाला देखील सामावून घ्यावे. ७२० किलोमीटर समुद्र किनारा असलेल्या कोकणातील मासेमारीबाबतीत धोरण ठरणार असेल व कोकणातील एकमेव तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महाविद्यालयाला त्यात स्थान नसेल तर मनसे हे खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारी राज्य शासनाच्या मत्स्य विभागाकडून जिल्हा समिती जाहीर झाली. त्या समितीमध्ये रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाला देखील स्थान देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular