26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriथर्टी फर्स्टसाठी गुहागरला पसंती, हॉटेल, लॉज व्यावसायिकांची चलती

थर्टी फर्स्टसाठी गुहागरला पसंती, हॉटेल, लॉज व्यावसायिकांची चलती

गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत.

कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरची ओळख सातासमुद्रापार पोहचली आहे. इथल्या पर्यटनस्थळांबरोबरच पर्यटक आता किनाऱ्यावरील थर्टी फर्स्ट पार्टीसाठी पसंती देत आहेत. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरू लागली आहेत. पर्यटक दरवर्षी गुहागरात वेगवेगळ्या हंगामात मोठी गर्दी करत असतात. पर्यटनासाठी सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी, प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.

वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयाच्या सुट्ट्यांमुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक गुहागरात धाव घेतात. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, उंट सफारी, खाद्यपदार्थांचे स्टॉल सज्ज झाले आहेत. शिवाय हॉटेल लॉज व घरगुती राहण्याच्या व्यवस्थाही पर्यटकांच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत. १५ डिसेंबरपासून गुहागर शहर व अन्य देवस्थाने आणि प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी पर्यटक गर्दीने दिसू लागले आहेत.

पर्यटकांच्या मुक्काम – तालुक्यात सुमारे ५६ हॉटेल, ३५ एमटीडीसी निवासस्थाने व ७५ घरगुती निवास आणि राहण्याची यापेक्षाही जास्त व्यवस्था आहे. पूर्वी गुहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक सलग तीन ते चार दिवस वास्तव्य करू लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटनस्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular