27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriखेडमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव

खेडमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच आता खेड मध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळायला लागल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पावसाळ्यामध्ये उद्भवणारे विविध आजाराबद्दल जनजागृती आणि पूर्व नियोजन ग्रामपंचायत आणि पालिका स्तरावर करण्यात आले होते. तरीही खेड तालुक्यात डेंग्यू रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतानाच निदर्शनास येत आहे.

कोरोनाच्या साथीशी दोन हाथ करताना त्रस्त झालेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता नवीन डेंग्यूचे संकट उभे राहिले आहे. त्याला वेळीच आळा घालण्यासाठी तत्परतेने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून संबंधित सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. घरामध्ये जास्त काळ साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या नाही आहेत ना हे तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शिवाय घर आणि आजूबाजूच्या परिसरात कुठेही सखल भागामध्ये पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घेण्यास नागरिकांना सांगण्यात आले आहे. डेंग्यूच्या साथीचा प्रसार होऊ नये यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घाव्यात याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे आवश्यक तिथे डासांचे प्रमाण वाढणार नाही, म्हणून फवारणी करण्याचे काम सुद्धा हातही घेण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून खेड शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेने आता डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाच्या संकटा पाठोपाठ आता डेंग्यूचे संकट आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डेंग्युपासून स्वत:ला वाचविण्यासाठी नागरिकांनी घराशेजारी पाण्याचे डबके साचू देवू नये, पिण्यासाठी पाणी उकळूनच प्यावे, तापाची साधी लक्षणं जरी दिसली तरी, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सुचना नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular