25.8 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRajapurकोकणातील पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ

कोकणातील पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ

पीक विम्याचे महत्व वाढले असून शेतकरी, बागायतदार पीक विम्याचा लाभ घेऊ लागले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये अवेळी पडणारा पाऊस, कमी-जास्त होणारे तापमान, वेगाचा वारा आदी प्रतिकूल परिस्थितीने आंबा-काजू पिकाला चांगलात तडाखा बसला. सातत्याने प्रतिकूल राहणाऱ्या स्थितीमुळे आंबा-काजू शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. या प्रतिकूल स्थितीमध्ये शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. यावर्षी तालुक्यातील ७८८ शेतकऱ्यांनी ३५६९.२८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तीनशे शेतकरी आणि ६५१.९६ हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे.

प्रतिकूल स्थितीचा कोकणातील शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगामातील उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असलेल्या आंबा आणि काजू पीकाच्या उत्पन्नावर होऊ लागला आहे. या स्थितीमध्ये यावर्षीही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये फळपीक विम्याने शेतकरी, बागायतदारांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे पीक विम्याचे महत्व वाढले असून शेतकरी, बागायतदार पीक विम्याचा लाभ घेऊ लागले आहेत.

गेल्यावर्षी तालुक्यातील ४८८ शेतकऱ्यांनी २९१७.३२ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ३ कोटी ३७ लाख ८५ हजार ०५० विमा हफ्ता भरला होता. त्यातून ३८ कोटी ४२ लाख ५४ हजार ९९६ रुपयांचे विमा संरक्षण शेतकऱ्यांच्या बागायतींना मिळाले होते. यावर्षी ७८८ शेतकऱ्यांनी ३५६९.२८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. त्यासाठी ४ कोटी ७ लाख ४७ हजार ३०१ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे ४४ कोटी ७२ लाख ९४ हजार १८१ रुपयांचे विमा संरक्षण मिळाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular