27.9 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeRatnagiriकै. संजीव साळवी फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर

कै. संजीव साळवी फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी आणि गोव्यामधील प्रसिध्द मॉडेलिंग फोटोग्राफर कै. संजीव साळवी यांच्या स्मृति दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या फोटोग्राफी ऑनलाईन स्पर्धेमध्ये २२८ स्पर्धकानी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी मॉडेलिंग आणि पोट्रेट अशा दोन थीम ठेवण्यात आलेल्या. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी जी जे सी ९५ फॅमिली आणि युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धेचे संयोजक बिपिन बंदरकर, प्रा.डॉ.आनंद आंबेकर तसेच संजीव साळवी यांचे सुपुत्र कुणाल संजीव साळवी यांनी केले. ९५ फॅमिली आणि युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक फोटोग्राफी करणाऱ्या कलाकारानी यामध्ये सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे परीक्षण मुंबई स्थित श्री. मिलिंद केतकर आणि श्री. समाधान पारकर या नामवंत फोटोग्राफरनी ऑनलाइन पद्धतीने केले, सदर स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे थीम प्रमाणे देण्यात आले आहेत.

पोर्ट्रेट फोटोग्राफी स्पर्धा :-

१. प्रथम क्रमांक – अक्षय परांजपे- रत्नागिरी

२. द्वितीय क्रमांक- आदित्य पुराणिक- पाली, रायगड

३. तृतीय क्रमांक- मनीष रूद्रे- सांताक्रुज, मुंबई

मॉडेलिंग फोटोग्राफी :-

१. प्रथम क्रमांक – ओम पाडाळकर – रत्नागिरी

२. द्वितीय क्रमांक- अमर शेठ – रत्नागिरी

३. तृतीय क्रमांक- अमेय गोखले- रत्नागिरी

सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणापत्र देण्यात आले असून, प्रथम क्रमांकासाठी श्री.पराग पानवलकर यांनी प्रायोजित केलेली रक्कम देण्यात आली आहे. स्पर्धेचे ऑनलाईन समन्वयक म्हणून युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनचे प्रा. शुभम पांचाळ आणि प्रा.डॉ.आनंद आंबेकर यांनी सखोल मेहनत घेतली आहे. तसेच बिपिन बंदरकर, डॉ.आनंद आंबेकर, परेश राजीवले, नितीन मिरकर,  शेखर कवितके, विजय मलुष्टे, संदेश गांगण, दीपक पवार या सर्वांचे प्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular