26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriपाली- वळके येथे विहिरीत पडला बिबट्या

पाली- वळके येथे विहिरीत पडला बिबट्या

४ तासांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले.

तालुक्यातील पालीनजीकच्या वळके गावात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत पडला. वनविभागाने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला. मात्र तब्बल ४ तास प्रयत्न करूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. शेवटी पिंजऱ्यात कोंबडी टाकून पिंजरा विहिरीत सोडताच बिबट्याने पटकन पिंजऱ्यात उडी मारली अन् ४ तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला. बिबट्याला सुरक्षित विहिरीबाहेर काढून तपासणीनंतर सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. पाली’ नजीक वाळके गावात शनिवारी सकाळी १० वा. राजेंद्र शिवाजी दळवी यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत युवा कार्यकतें सौरभ खाके यांनी वनविभागाला कळविले.

ताबडतोब वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी १०.३० वा.च्या सुमारास रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या सहाय्याने रेस्क्यूला सुरूवात केली. बिबट्या हा विहिरीमध्ये असलेल्या कपारीत बसलेला दिसून आला. तो भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. लोकवस्ती असलेल्या या विहिरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने सोडण्यात आला. बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र काही केल्या बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. त्यानंतर पिंजरा विहिरीबाहेर घेऊन पिंजऱ्यामध्ये जिवंत कोंबडी ठेवण्यात आली.

त्यानंतर पुन्हा पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. कोंबडी बघताच बिबट्याने पटकन पिंजऱ्यात उडी मारली व कोंबडीवर ताव मारला अन् तब्बल ४ तासांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. सदरचा बिबट्या हा मादी जातींचा असून वय सुमारे तीन वर्ष असल्याचे सांगण्यात आले. मादी बिबट्या हा तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी व मानद वन्यजीव रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पिंजऱ्यामध्ये जिवंत कोंबडी ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. कोंबडी बघताच बिबट्याने पटकन पिंजऱ्यात उडी मारली व कोंबडीवर ताव मारला अन् तब्बल ४ तासांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. सदरचा बिबट्या हा मादी जातींचा असून वय सुमारे तीन वर्ष असल्याचे सांगण्यात आले. मादी बिबट्या हा तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी व मानद वन्यजीव रत्नागिरी -यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular