मंगला एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणावर बेवारस बॅगा ठेवल्या गेल्याच्या एका मेसेजने एकच खळबळ उडवली. रेल्वे सह पोलीस यंत्रणाही लागली काम ाला. डॉग स्कॉडही बोलवण्यात आलं. धुक्यामुळे रेल्वे तब्बल ७.३० तास उशीरा आली. रेल्वे रत्नागिरी स्थानकात दाखलं होताच तपास सुरु झाला. खरोखरच दोन डब्यात मिळून पाच मोठ्या बॅगा सापडल्या. त्यात स्फोटके किंवा अंमली पदार्थ असे काहीच आढळून आले नाही. हुक्का पिण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे यात सुटे भाग होते. बॅगांच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. प्रजास्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा अगोदरच अलर्ट वर राहिलेली होती. या दरम्यान शुक्रवारी हजरत निजामउद्दीनवरून सुटलेली मंगला एक्सप्रेस ही शुक्रवारी संध्याकाळी ८.३० वाजता रत्नागिरीत आली.
दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं पसरलेलं असून दिल्लीवरून सुटणाऱ्या गाड्या या उशिराने धावत आहेत. ही गाडी दुपारी १ वाजता रत्नागिरी स्थानकावर येण्याची वेळ आहे. मात्र ती ७.३० तास उशीराने आली. मंगला एक्सप्रेस ही निजामउद्दीन सुटून एर्नाकोलमला जाणारी एक्सप्रेस आहे. या गाडीच्या शेवटच्या स्लीपर कोच व जनरल डबा दोन डब्यांमध्ये पाच मोठ्या संशयास्पद बॅगा ठेवलेल्या असल्याचा एक फोन रेल्वे प्रशासनाला आला. आणि रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तात्काळ शहर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी शहर पोलीस महेश तोरसकर यांच्यासोबत डॉग पथकाला रेल्वे स्टेशनला पाठवले.
मंगला एक्सप्रेस ही रेल्वे स्टेशन रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आली. तपासणी करण्यात आली असता. बोगीत बॅगा असण्याचा मिळालेला संदेश खरा ठरला. तात्काळ बोगीतील बॅगा खाली उतरवण्यात आल्या. रेल्वे पोलिसांनी बाहेर काढलेल्या बॅगांची डॉग पथकाने तपासणी केली. मात्र त्यात स्फोटके किंवा अंमली पदार्थ असे काहीच आढळून आले नाही. त्या बॅगा गोव्याला जाणाऱ्या असाव्यात, असा निष्कर्ष काढण्यात आला. कारण त्याम ध्ये हुक्का पिण्यासाठी यंत्राचे सुटे भाग होते. दरम्यान पोलिसांनी या सामानाचे कोणी मालक आहे? याची विचारणा केली. पण कोणीच पुढे आलं नसल्याने रेल्वेने ते सामान जप्त केले. दरम्यान या सामानाच्या मालकाचा शोध घेतला जात आहे.