28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकोकणात राजकीय भूकंप होण्याचे संकेत...

कोकणात राजकीय भूकंप होण्याचे संकेत…

या दौऱ्यापूर्वी कोकणात राजकीय भूकंप घडवण्यासाठी शिवसेना नेते कामाला लागले आहेत.

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना कोकणात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एका मोठा नेता शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात असून वरिष्ठ पातळीवरून त्याबाबत बोलणी चालू असल्याची माहिती पुढे आली आहे. हा भूकंप झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातीलंच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेची न्यायालयीन लढाई सुरू असताना नुकतीच विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेऊन आपला निकाल जाहीर केला. या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यांचा उद्या शुक्रवारपासून कोकण दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यापूर्वी कोकणात राजकीय भूकंप घडवण्यासाठी शिवसेना नेते कामाला लागले आहेत. रत्नागिरीत देखील अशाचप्रकारे मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रत्नागिरीत एक बडा नेता नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आत्ता तर नाक्यानाक्यावर त्याबाबतची चर्चा सुरू आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. थेट मातोश्रीवरूनच बोलणी सुरू असल्यांची माहिती देखील पुढे येत आहे. हा नेता गोरगरीबांसह तरुणवर्गाचा आयडॉल आहे. त्यामुळे या नेत्याला प्रवेश देण्यासाठी शिवसेना नव्हेच सर्वच पक्ष डोळे लावून आहेत. गेल्या २ दिवसांपासून रत्नागिरीत या भूकंपाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. आता तर उघडपणे राजकीय भूकंप घडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि रत्नागिरीत घडणारा राजकीय भूकंप याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular