चिपळूणमधील उदभवलेल्या आसमानी संकटात सापडलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट देऊन, सांत्वन करून आधार दिला. या दौऱ्यावर असताना सोबत भास्कर जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर येणार समजल्यावर, सर्व व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी तुफानी गर्दी केली होती. त्यातील एक महिला तर जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून मुख्यमंत्री महोदयांना सारख्या विनवण्या करत होती, की आमचे सर्वेच वाहून गेले, मागे काहिही उरले नाही. आम्हाला नुसती आश्वासन नको, खरीखुरी मदत करा. आम्हाला मदत केल्याशिवाय इथून जाऊ नका, आम्हाला ऐकटं सोडून जाऊ नका. आम्हाला मदत करा, हवं तर आमदार खासदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी सरळ विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावीची भाषा केली आणि त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही, तरी काही फरक पडत नाही असे सांगत, महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ वेगाने सर्वत्र व्हायरल झाला आहे.
त्या व्हिडीओवर अखेर भास्कर जाधवांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाच्यासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा बोलताना सुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलाव लागणार असेल तर मग काम कऱणं कठीण बनणार आहे. पण, विनाकारण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक आता तुटून पडले आहे. जे कोणी हे जाणूनबुजून घडवून आणलं आहे, त्याला योग्य वेळी उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.