रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा या म्हण दोन्ही पक्षांनी दावा केल्याने गेले काही दिवस राजकीय घडामोडींना वेग आला असून सोशल मीडियावर तर दोन्ही बाजूंनी ‘पोस्ट खखेो वॉर’ सुरू आहे. यामुळे हा मतदारसंघ साऱ्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणारे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक किरण तथा भैय्या सामंत यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची पोस्ट मंगळवारी रात्री उशीरा सोशल मीडियावर शेअर केल्याने राजकारणात द्वीस्ट आला. मात्र बुधवारी सकाळी भैय्या सामंत यांचे बंधू आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा अद्यापही कायम असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, किरण सामंत यांनी मध्यरात्री केलेली पोस्ट देखील त्यांच्या अकाऊंटवरुन बुधवारी सकाळी डीलिट करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाल्याने नेमके राजकारण काय? अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच कोणीतरी ‘दम’ दिल्यानेच किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे कुणी कुणाला दम दिला? याची चर्चा आता रंगली असून वैभव नाईक यांचा रोख कुणावर आहे हे लोकं समजून चुकल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही.
महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपलाच उमेदवार या म तदारसंघातून लढेल असा ठाम दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि सिंधुरत्न योजनेचे संचालक, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक किरण तथा भैय्या सामंत यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तर भाजपनेही आपला दावा कायम ठेवला असून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे हे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील असे सांगण्यात येत आहे.
मतदारसंघ भाजपचाच ! – गेले बरेच दिवस जागावाटपाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी ना. नारायण राणे यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाजपचा मतदारसंघ आहे, कमळ या निशाणीवरच या मतदारसंघाचा उम दवार लढेल, कुणी लुडबूड करू नये, असा थेट इशारा दिला. त्याचवेळी पक्षाने आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिली तर आपण लढू आणि जिंकू, असा विश्वासदेखील त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बुधवारपासून आपण या मतदारसंघात प्रचारासाठी जात आहोत, असेदेखील त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेचा दावा कायम – मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी भाजपचाच उमेदवार असेल, असे सांगताच या म तदारसंघाचा तिढा आता सुटला आणि नारायण राणे हेच उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र शिवसेनेचा दावा कायम असल्याचे त्यानंतर शिवसेनेच्या नेतेमंडळींनी स्पष्ट केले. २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सध्या हा उमेदवार शिवसेनेसोबत (शिंदे गट) नसला तरी या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे आणि शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघात महायुतीच्या सहकार्याने अडीच लाख मतांनी निवडून येईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली होती..
मध्यरात्रीची पोस्ट – या मतदारसंघावर शिवसेना आणि भाजप या दोघांनीही दावा केल्यापासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या दाव्यासह पोस्ट व्हायरल करत आहेत. अशीच एक पोस्ट मंगळवारी रात्री उशिरा इच्छूक उमेदवार किरण सामंत यांनी व्हायरल केली.
काय म्हणाले किरण सामंत? – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि अब की बार चारसो पार हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत. आपण निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. रात्री उशिरा ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली.
सकाळी पोस्ट डिलीट – दरम्यान, मंगळवारी रात्री केलेली ही पोस्ट त्यांनी बुधवारी सकाळी मात्र डीलिट केल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्काना उधाण आले. त्यातच इच्छूक उमेदवार भैय्या सामंत यांचे बंधू ना. उदय सामंत यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा अद्यापही कायम असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
काय म्हणाले उदय सामंत ? – ना. उदय सामंत यांनी सांगितले की, माझे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे भावनिक आणि संवेदनशील आहेत. राजकारणात संवेदनशील राहणे नक्कीच चांगली गोष्ट आहे. भावनिक होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये या हेतूने त्यांनी तशी पोस्ट व्हायरल केली असे कळते. शिवसेनेचा या मतदारसंघावर हक्क असून आमचा दावा कायम आहे. तथापि याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जो निर्णय होईल तो मान्य असेल.
गुंता वाढला – मध्यरात्री भैय्या सामंत यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट बुधवारी सकाळी डिलीट करण्यात आल्याने आणि त्यानंतर ना. उदय सामंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने या मतदारसंघांबाबतचा गुंता वाढत चालल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे..
दम’ दिल्याचा आरोप – ‘या साऱ्या गदारोळात शिवसेना ठाकरे गटाचे मालवण-कुडाळचे आम दार वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुणीतरी ‘दम’ दिल्यामुळेच किरण सामंत यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असा दावा पत्रकारांशी बोलताना केल्याने गोंधळात भर पडली आहे. दम दिल्यामुळे किरण सामंत यांनी माघार घेतली असली तरी कोकणातील जनता मात्र अशा धमक्यांना भीक घालणार नाही, असेही आमदार नाईक यांनी म्हटले आहे.
समजून चुकले ! – आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप करताच त्यांचा रोख कुणावर आहे? हे कोकणातील चाणाक्ष बुद्धीच्या जनतेने लगेच ओळखले असून जे काही समजायचे ते जनता समजून चुकली आहे, असे आता बोलले जात आहे.