केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आली तर सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ येईल. घटना बदलून आपल्याला देशोधडीला लावतील, कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. शासकीय यंत्रणांचा वापर करून सर्वसामान्यांना वेठीस धरून राज्यकारभार केला जाईल. त्यामुळे आताच वेळ आहे. ही लोकसभा निवडणूक हीच संधी आहे. एकत्र या एकजुटीची ताकद दाखवा आणि मुजोर सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी आमदार रमेश कदम यांनी केले. चिपळूण शहरातील महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील चितळे मंगल सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, तसेच शिवसेना उप नेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रम ख सचिन कदम, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, तालुकाप्रमुख विनोद झगडे, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ. जाधव, शिवसेना शहर महिला संघटक वैशाली शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शहा यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कामाला लागा! – रमेश कदम यावेळी म्हणाले, ही निवडणूक आपण जिंकली तर पुढील सर्व निवडणूका आपल्याला सोप्या जातील. आगामी सर्व निवडणुका आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच लढवायच्या आहेत. चिपळूणची नगरपालिका देखील एकहाती जिंकू, आणि आमदार पण आपलाच असेल. पण त्यासाठी आताची निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी कामाला लागा, प्रत्येक घरात जा, मशाल चिन्ह घराघरात पोचवा आणि विनायक राऊत यांना किमान तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आज पासूनच कामाला लागा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.
गाफील राहू नका – महाडिक संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले मतदारसंघात अतिशय चांगले वातावरण आहे. आम्ही प्रत्येक जिल्हापरिषद गटात फिरत आहोत. उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. अगदी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात देखील उत्स्फुर्त असा ‘प्रतिसाद मिळत आहे. परंतु असे असले तरी गाफील राहू नका. सर्व काही चांगले आहे म्हणून आपण जर गाफील राहिलो तर दगा फटका बसेल. त्यामुळे सम ोरच्याला कोणतीही संधी राहता कामा नये या जिद्दीने कामाला लागा. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद आता बरोबर आहे. रमेश कदम सारखे नेते आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण विधानसभा मतदारसंघातुन गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य विनायक राऊत यांना मिळवून द्या. जे आपल्याला सोडून गेलेत त्यांचा विचार करू नका. जे गेलेत त्यांच्यामुळे जास्त काही फरक पडलेला नाही. आणि त्यांची काय अवस्था झालीय हे देखील तुम्ही पाहता. त्यामुळे समोर उमेदवार कोण? कोणत्या पक्षाचा? याचा अजिबात विचार न करता विनायक राऊत आणि मशाल हेच समोर ठेवून काम करा असे आवाहन त्यांनी केले.
जिद्द सोडू नका – यादव राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव म्हणाले ही निवडणूक ऐतिहासिक आहे. आपले सर्वांचे भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे कोणतेही हेवेदावे, गटातट न ठेवता एकत्र या. कोणाच्या आमंत्रणाची वाट पाहत बसू नका. आपली जबाबदारी आहे, निवडणूक आपली आहे, असे समजून काम करा, शहरी भागात सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, टीव्ही या म ाध्यमांचा प्रभाव जास्त असतो. येथील मतदार हा सुशिक्षित असतो. त्यामुळे येथे आपल्याला सर्वाधिक काम करावे लागणार आहे. गेल्या वेळी शहरात काहीही नसताना भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला होता हे लक्षात ठेवा. ती चूक पुन्हा होता कामा नये याची पूर्ण खबरदारी घ्या. एक एक मत बूथ पर्यंत पोहचे पर्यंत जिद्द सोडू नका असे अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन त्यांनीं यावेळी केले.