26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraव्यापाऱ्यांना उभे करायचे तर जिल्हा बँकेने कोणतेही निकष न ठेवता सूट द्यावी...

व्यापाऱ्यांना उभे करायचे तर जिल्हा बँकेने कोणतेही निकष न ठेवता सूट द्यावी – निलेश राणे

भाजप प्रदेश सचिव माजी खा. नीलेश राणे यांनी चिपळूणसह पुरामुळे बाधित झालेले जिल्ह्यातील अनेक व्यापारी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे मुद्दल, व्याज, आवश्यक कागदपत्रे या मानसिकतेमध्ये सध्या व्यापारी नाही आहेत, त्यामुळे जिल्हा बँकेला जर या व्यापाऱ्यांना पुन्हा उभं करायचं असेल तर, त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी वर्षभर सगळ्याच निकषातून सूट देऊन थेट मदत करावी, असे आवाहन केले आहे.

रत्नागिरी जिल्हा बँकेने चिपळूणसह जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना अल्प व्याज दरात कर्ज दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. यावेळी कर्जदारांनी वर्षभर कर्जाचा हप्ता भरायचा नाही. केवळ व्याज भरायचे असे बँकेने घोषित केले आहे. परंतु, अजूनही व्यापाऱ्यांमध्ये या घोषणेबद्दल, अनेक शंका-कुशंका मनामध्ये आहेत. बँकेने ही घोषणा करताना अनेक गोष्टी स्पष्ट जाहीर केलेल्या नाहीत. हप्ता भरायचा नाही तर वर्षभर व्याज तरी का भरायचे? वर्षभराने हप्ता कसा भरायचा, असे कोणतेही तपशील बँकेने सद्य स्थितीला घोषित केलेले नाहीत.

बँकेने या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी १ वर्ष संपूर्ण कर्ज वापरायला दिले पाहिजे. केवळ मुद्दलच नव्हे तर व्याजातूनही वर्षभर सुट दिली पाहिजे. कागदपत्रे आणि तारण या गोष्टीतूनही आता या परिस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांना सूट देणे आवश्यक आहे, तरच या परिस्थितीमधून व्यापारी वर्ग बाहेर पडून यशस्वीरित्या उभा राहू शकतो, असेही प्रतिपादन नीलेश राणे यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले की, मागील ४ दिवस चिपळूणमधील विदारक परिस्थिती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. इथला व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने, पुर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे लातूर भूकंप, पूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये अडलेल्या व्यापाऱ्यांना संकटाच्या वेळी विशेष सवलत देण्यात आलेल्या त्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी सुद्धा अशी विशेष सवलत बँकेने घोषित केली पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular