31 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजिल्हाधिकार्‍यांचे बनावट फेसबूक खाते

जिल्हाधिकार्‍यांचे बनावट फेसबूक खाते

रत्नागिरी जिल्हाधिकारी नावाने काढण्यात आलेले फेसबुक अकाउंट हे बनावट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी तातडीची दखल घेऊन रत्नागिरीकरांना यासंदर्भात सावध केले आहे. या लिंक वरून कोणत्याही प्रकारची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती न स्वीकारता ब्लॉक करण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी केले आहे.

या बनावट फेसबुक अकाउंट लिंक विविध ठिकाणी सोशल मीडिया संकेतस्थळावरून शेअर केली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगून आपले फेसबुक अकाउंट वापरणे हे किती गरजेचे आहे हे देखील या घटनेनंतर समोर येत आहे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे या फेसबुक अकाउंट वरून कोणत्याही स्वरूपाची मागणी केली केल्यास जवळच्या पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क साधावा जेणेकरून लवकरात लवकर अशा प्रकारच्या खोट्या फेसबुक प्रोफाइल बनवणाऱ्या  व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकेल.

याआधी देखील शासकीय कर्मचाऱ्यांची, काही अधिकाऱ्यांची आणि रत्नागिरीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींची बनावट खाती काढण्यात आली होती. या घटनेनंतर रत्नागिरीकरांमध्ये एकच खळबळ उडाली असून आपले सोशल लाइफ हे सोशल राहिले नसून एक प्रकारची दुधारी तलवारच आपण घेऊन फिरतोय अशी जाणीव जनसामान्यात झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular