27.5 C
Ratnagiri
Thursday, February 19, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeChiplunचिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

आंबा, फणसाचे मोठे नुकसान झाले.

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस पडला. या पावसात अनेक घरांवर झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे व कौले उडाली. अवकाळी पावसामुळे ३० लाख ६२ हजार, ९७० रूपयाचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. वादळामुळे काही ठिकाणी विद्युत वाहिन्यां व पोलवर झाडांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. आंबा, फणसाचे मोठे नुकसान झाले. मार्कंडी येथे बी अॅड सी कॉलनीत विजेच्या खांबावर झाड कोसळून दोन खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.

तालुक्यातील रामपूर, ‘कोळकेवाडी, कामथे, खेर्डी आणि पोफळ येथील ५५ घरांचे अंशतः नुकसान होऊन १७ लाख ९९ हजार ४७० रुपयाचे नुकसान झाले. ६ गोठ्यांचे अंशतः १ लाख १९ हजार ५० रुपये नुकसान झाले. तर एका गोठ्याचे पूर्णतः नुकसान होऊन चार गुरे दगावली त्यात २ म्हशीं, १ जर्सी गाय, वासराचा समावेश होता. त्यांचे ५ लाख १० हजाराचे नुकसान झाले. ६ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊन ६ लाख ३४ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हवेत काही काळ गारवा पसरला होता. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता.

RELATED ARTICLES

Most Popular