28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriरत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

प्रत्येक डेपोला ३५ ते ४० इलेक्ट्रिक बसची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना इलेक्ट्रिक ‘बस लवकरच मिळणार आहेत. प्रत्येक डेपोला ३५ ते ४० इलेक्ट्रिक बसची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले, या गाड्यांचे डेपोंमध्येच चार्जिंग होणार आहे. त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांकडून डेपोपर्यंत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरीतील नाचणे उपकेंद्रातून माळनाका येथील विभागीय नियंत्रक कार्यालयामागेचार्जिंग स्टेशनसाठी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटींचे सुमारे ६५ हजार १६० किलोमीटरपर्यंत दरवर्षी मार्गक्रमण होते.

सन २०२२- २३ च्या आकडेवारीनुसार दररोज ६३८ एसटींच्या दैनिक फेऱ्या आहेत. सध्या डिझेलवर चालणाऱ्या ७९४ बसेस आहेत. त्यात आता रत्नागिरी, खेड आणि दापोलीमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांची लवकरच भर पडणार आहे. या बसगाड्यांची चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होण्यासाठी आगारापर्यंत महावितरणकडून वीज वाहिन्या टाकल्या जात आहेत. रत्नागिरीतील माळनाका, येथे विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागे कार्यशाळा आहे. या ठिकाणी डिझेल पंप आणि करण्यासाठी गॅरेज आहे. याचठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार आहे. त्यासाठी महावितरणच्या नाचणे उपकेंद्राकडून जमिनीखालून वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular