26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunअंतिम टप्प्यातही आंब्याला चांगली मागणी…

अंतिम टप्प्यातही आंब्याला चांगली मागणी…

आंबा बाजारात ४०० ते ६५० डझन या दराने विकला जात आहे.

तालुक्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे काही भागातील आंबा हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे. तालुक्यातील आंबा हंगाम देखील अंतिम टप्प्यात आला आहे; मात्र मागणी कायम असल्यामुळे दर अजूनही तेजीत आहेत. तालुक्यात मार्चपासून आंबा हंगाम सुरू झाला; परंतु नियमित हंगाम हा एप्रिलपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात अतिशय कमी प्रमाणात आंबा बाजारपेठेत दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात आले.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चिपळूणमधील भागांमध्ये तयार झालेला आंबा बाजारपेठेत आला. निम्मे फळ झाडावर असताना अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बागायतदारांनी नुकसानीच्या भीतीने तयार फळ बाजारात विक्रीसाठी आणले. त्यात कच्चे आंबेही विकण्यात आले. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत आंब्याची मोठी उलाढाल झाली. तयार झालेले परंतु जमिनीवर पडलेले आंबे कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे आता विक्रेत्यांकडे अतिशय कमी प्रमाणात आंबा आहे; मात्र आंब्याची मागणी ग्राहकांकडून कायम आहे. तयार झालेला आंबा बाजारात ४०० ते ६५० डझन या दराने विकला जात आहे.

कच्चे आंबे दोन हजार रुपये शेकडा या दराने विकले जात आहेत. कच्च्या आंब्याला ग्राहकांकडून फार प्रतिसाद नाही. कारण, मागील पंधरा दिवस पाऊस झाल्यामुळे कच्चे आंबे तयार होईपर्यंत ते खराब होण्याची शक्यता आहे. या भीतीने विक्रेतेही कमी दरात कच्चे आंबे विकत आहेत; मात्र तयार आंबे ग्राहक घेण्यास प्राधान्य देत असल्यामुळे त्याचे दरही चढे आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular