20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळुणात गटारांवरील अतिक्रमणे हटवली, पालिकेकडून स्वच्छता

चिपळुणात गटारांवरील अतिक्रमणे हटवली, पालिकेकडून स्वच्छता

तुंबलेल्या गटारामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती.

नुकत्याच पार पडलेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत चिपळूण बाजारपेठेतील गटारांची स्वच्छता करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी शहर व बाजारपेठेतील गटारांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. गटारांवरील कडप्पे, लेंटल, बांधकामे काढून केलेले अतिक्रमण देखिल हटविण्यात आले. चिपळूण पालिकेकडून मॉन्सूनपूर्व कामांची लगबग सुरू आहे. शहरातील नाले, पन्हे, गटारांची साफसफाई केली जात आहे.

चिपळूण बाजारपेठेत रस्त्यालगत गटार आहे. दुकानदार, व्यावसायिकांनी या गटारांवर कडप्पे, लेंटल तर काही ठिकाणी बांधकामे करून ती गटारे झाकली होती. त्यामुळे सफाई कामगारांना या गटारांची साफसफाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. गटारात प्लास्टिक बॉटल्स, मातीसह अन्य कचरा अडकला होता. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणे अवघड बनले होते. हे गटारातील पाणी रस्त्यावर व दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता होती. तुंबलेल्या गटारामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती.

नुकतीच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे चिपळूण पालिकेने मॉन्सूनपूर्व नियोजन बैठक घेतली. त्यामध्ये बाजारपेठेतील तुंबलेल्या गटारांचा विषय समोर आला. या गटारांची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र, गटारांवर टाकण्यात आलेले कडप्पे, लेंटल यामुळे गटारांची स्वच्छता करता येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर व्यापारी संघटनेने गटारांची सफाई करा, जिथे जिथे अतिक्रमण झाले असेल ते तोडा अशा सूचना केल्या होत्या.

त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून बाजारपेठेतील गटारांची स्वच्छता मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात शहरातील चिंचनाका ते बाजारपेठेतील डायमंड कॉम्प्लेक्स परिसरापर्यंतच्या गटारातील गाळ काढण्यात आला आहे. यासाठी गटारांवरील कडप्पे, लेंटल यांच्यासह कच्ची व पक्की बांधकामेही तोडण्यात आली. गटारांतून मोठ्या प्रमाणावर माती, कचरा व प्लास्टिक बॉटल्स जमा झाल्या होत्या. त्या काढण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Most Popular