चिपळुणमध्ये ओढवलेल्या पूरग्रस्त जागांची पाहणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आम. नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे चिपळूणवासियांचे अगणित नुकसान झाले आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांचे विविध प्रकारे नुकसान झाले असून जीवितहानी देखील झाली आहे. चिपळूण शहरासह एकूण १८ गावे बाधित झाली असून, शासनाने कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र ही मदत भरपूर आहे असे न म्हणता, मागील नैसर्गिक आपत्तीच्या वेळीची मदत पाहता ही त्यामानाने भरीव मदत केली गेली आहे.
व्यापाऱ्यांचे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान झाले असून, व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय उभा राहण्यासाठी शासनाने आर्थिक पाठींबा देणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या घडीला व्यापार्यांना कमी व्याज दरात कर्ज पुरवठा करावा, देण्यात आलेली शासकीय मदत हि पुरेशी नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे,अशी मागणी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे चिपळुणात आलेला महापूर ही नैसर्गिक आपत्ती असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हि पूरस्थिती ओढव्ल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून, नदीतील गाळ उपसा केला गेला नसल्याने, तसेच प्रशासनाने आम्हाला अलर्ट केले नाही त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,अशी मागणी देखील मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. भविष्यामध्ये अशा दुर्घटनाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कोणत्या उपायकारक योजना आखाव्या लागतील याचे देखील निवेदन दिले जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आम. नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे आदी उपस्थित होते.